......................युद्धकाण्ड (सर्ग 1 ते 16).....................
सर्ग 1 - युद्धकाण्ड: प्रथमः सर्गः
राम मारुतीची प्रशंसा करतो, समुद्र कसा तरावा ह्याविषयी रामाला काळजी, राम मारुतीला लंकेचे स्वरूप विचारतो, मारुतीचे लंकावर्णन, सर्वांना घेऊन राम लंकेकडे निघतो, सैन्य कोठेही न थांबता समुद्रतीरावर येऊन थांबते, तेथे सैन्याचा तळ देतात, समुद्र पाहून सर्व खिन्न होतात, रामाचा सीतेकरिता मायावी शोक
सर्ग 2 - युद्धकाण्ड: द्वितीयः सर्गः
मारुतीच्या पराक्रमाने रावण लज्जित होतो, रावणसभेत राक्षस रावणाला उत्तेजन देतात, कुंभकर्णाशी रावणाची मसलत, इंद्रजित लढाईवर जाण्यासाठी अनुज्ञा मागतो, बिभीषणाचा उपदेश, रावण बिभीषणाला धिक्कारतो, बिभीषणाचा पुन्हा उपदेश, रावणाचा त्याग व रामाकडे जाणे
सर्ग 3 - युद्धकाण्ड: तृतीयः सर्गः
बिभीषण चार मंत्र्यांसह रामाकडे येतो, सुग्रीवाची बिभीषणाबद्दल शंका, राम सुग्रीवाची समजूत काढून बिभीषणाला जवळ बोलावितो, राम-बिभीषण भेट, बिभीषण रामाची स्तुती करतो, राम प्रसन्न होतो, बिभीषण भक्ति व ज्ञान मागतो, रामाकडून बिभीषणाला लंकेचा राज्याभिषेक, सुग्रीव-बिभीषणाची मैत्री, रावणाकडून आलेल्या शुकाचा फितुरीचा प्रयत्न, वानर त्याजवर धावतात, राम निवारण करतो, सुग्रीवाचा शुकाला निरोप, शार्दुलाच्या वार्तेने रावणाला चिंता, राम समुद्रावर जातो, समुद्र रामाला शरण येतो, समुद्राने केलेली रामस्तुती, रामाचा अमोघ बाण, आभीरांचा नाश, नलाने सेतू बांधावा म्हणून समुद्राचा सल्ला, नल सेतू बांधतो
सर्ग 4 - युद्धकाण्ड: चतुर्थः सर्गः
रामेश्वराची स्थापना, राम सेतू ओलांडून सुवेळ पर्वताला वेढा घालतो, पर्वतावरून लंका पाहतात, शुक रावणाला निरोप सांगून उपदेश करतो
सर्ग 5 - युद्धकाण्ड: पञ्चमः सर्गः
शुकावर रागावून रावण त्याला घालवून देतो, शुकाचा वृत्तांत, माल्यवान लंकेतील अपशकून सांगतो व रामाला शरण जाण्याचा उपदेश करतो, माल्यवानाचा रावणाकडून धिक्कार, रावणाची राक्षसांना युद्धास जाण्याची आज्ञा, राम बाणाने दहाही मुकुटांचा छेद करतो, रावण प्रहस्तादिकांना रामावर पाठवितो, वानरांचा लंकेला वेढा, तुमुल युद्ध, रावणसैन्याचा चौथा भाग राहातो, इंद्रजित वानरांवर चालून येतो, वानर युद्धात पडतात, द्रोणगिरी आणण्यासाठी राम मारुतीला पाठवतो, मारुती द्रोणाचल आणतो, वानर उठतात, रावण सर्व सेनापतींना युद्धावर पाठवितो, ते वानरसेनेचा नाश करतात, रामशक्तिमुळे वानर बलाढ्य होतात
सर्ग 6 - युद्धकाण्ड: षष्ठः सर्गः
रावण युद्धक्षेत्री येतो, मयशक्ति बिभीषणावर टाकतो, ती लक्ष्मणाला लागते, मारुती रावणाच्या वक्षावर प्रहार करतो, रावणाची दुर्दशा, मारुती लक्ष्मणाला रामाकडे आणतो, शक्ति रावणाच्या रथावर जाते, रावण रामावर धावून येतो, रामरावणाचे प्रथम युद्ध, रामाज्ञेने मारुती ओषधि आणण्यास जातो, मारुतीला अडथळा करण्याकरिता रावण कालनेमीची योजना करतो, कालनेमीचा रावणाला उपदेश
सर्ग 7 - युद्धकाण्ड: सप्तमः सर्गः
कालनेमीवर रावण संतापतो, कालनेमी रावणाला वश होतो, कालनेमीचे तपोवन, मारुतीची कालनेमीशी तपोवनात भेट, मारुतीशी कालनेमीचे कपटी संभाषण, मारुती महाकाय मगरीला मारतो, मगरी अप्सरारुपात प्रकट होते, धान्यमाली कालनेमीचा वृत्तांत सांगते, मारुती कालनेमीचा वध करतो, मारुती ओषधि घेऊन येतो व लक्ष्मण शुद्धिवर येतो, राम पुन्हा युद्धासाठी सज्ज होतो, रावण रामबाणाने विद्ध होतो, तो अनरण्याची कथा असुरांना सांगतो, रावण कुंभकर्णाला उठवून आणवितो, रावण त्याला सर्व वृत्त सांगतो, कुंभकर्णाचा उपदेश
सर्ग 8 - युद्धकाण्ड: अष्टमः सर्गः
कुंभकर्णावर रावण संतापतो, कुंभकर्ण युद्धासाठी जातो, वानर भयभीत होतात, बिभीषण त्याला भेटून आपली कथा सांगतो, कुंभकर्ण बिभीषणाला आलिंगन देऊन निरोप देतो, कुंभकर्ण वानरांचा नाश करतो, राम व कुंभकर्णामध्ये घनघोर युद्ध, कुंभकर्णाचा वध, देवगंधर्वांची रामावर पुष्पवृष्टि, नारद येऊन रामाची स्तुती करतो, रावणाचा शोक, इंद्रजित त्याचे सांत्त्वन करतो आणि निकुंभिलेत होम आरंभितो, बिभीषण ती वार्ता रामाला कळवितो व लक्ष्मणास पाठविण्याची प्रार्थना करतो
सर्ग 9 - युद्धकाण्ड: नवमः सर्गः
राम बिभीषणाबरोबर लक्ष्मणास पाठवितो, लक्ष्मणाचा उत्साह, हनुमान, अनेक वानर यांसह लक्ष्मण इंद्रजितावर चालून जातो, इंद्रजितावर बाणांची वृष्टि करतो, वानरांचे व राक्षसांचे तुमुल युद्ध होते, होम अर्धवट टाकून इंद्रजित लक्ष्मणावर धावून येतो, बिभीषणाची निर्भत्सना करतो, लक्ष्मण व इंद्रजिताचे युद्ध, इंद्रजिताचे कवच फाटते, लक्ष्मणाचे कवच खाली पडते, अनिश्चित स्वरूपात लढाई, लक्ष्मण इंद्रजिताचे धनुष्य, रथ, घोडे ह्यांचा नाश करतो, इंद्रजितही दुसरे धनुष्य घेऊन वानरांची दाणादाण करतो, लक्ष्मण ऐंद्रास्त्राची योजना करून इंद्रजिताचा वध करतो, देवांचा व वानरांचा आनंद, राम लक्ष्मणाची प्रशंसा करतो, पुत्रवधाची वार्ता ऐकून रावण मूर्च्छित होतो, क्रोधाने सीतेला मारण्यासाठी जातो, सुपार्श्व रावणाचा प्रतिकार करतो
सर्ग 10 - युद्धकाण: दशमः सर्गः
उरलेल्या राक्षसांसहित रावण रामावर चालून जातो, रामाच्या बाणाने घायाळ होऊन लंकेला जातो, रावण-शुक्राचार्य यांची भेट, शुक्राचार्य रावणाला होम करण्यास सांगतो, बिभीषण ती वार्ता रामास कळवितो, अंगदादि वानर होमाचा विध्वंस करण्यासाठी लंकेत जातात, सरमा होमस्थान दाखवते, होमाचा विध्वंस, मंदोदरीची विटंबना व तिचा शोक, अनुष्ठान सोडून रावण तिचे सांत्त्वन करतो, मंदोदरीचे रावणाला उद्देशून भाषण, रावण आपला उद्देश कळवितो
सर्ग 11 - युद्धकाण्ड: एकादशः सर्गः
रावण युद्धाला निघतो, रावणाचे मारुतीशी युद्ध, रावणाच्या मुष्टिप्रहाराने मारुती मूर्च्छित होतो, सावध होऊन पुन्हा लढतो, रामरावणाचे भयंकर युद्ध, इंद्र मातलीबरोबर दिव्य रथ पाठवितो, राम-रावणाचे अस्त्रांवर अस्त्रे टाकून भयंकर युद्ध होते, राम विव्हल झाल्याचे पाहून देवादिकांना खेद होतो, राम इंद्रधनुष्यासारखे धनुष्य घेऊन रावणावर बाण सोडतो व त्याची मस्तके तोडतो, मस्तके पुन्हा जोडली जातात, रावणाच्या नाभीस्थानी असलेले अमृत आग्नेयास्त्राने सुकविण्याची सूचना बिभीषण देतो, राम रावणाच्या नाभीचा छेद करतो, रावणावर ब्रह्मास्त्र सोडण्याची सूचना मातली देतो, राम निर्वाणीचा बाण सोडतो, रावण गतप्राण होतो, राक्षससेना पळत सुटते, रावणाच्या शरीरातून तेज निघून ते रामरुपी विलिन होते, देव आश्चर्य करतात, रावणाची विरोधभक्ती, नारदाची प्रार्थना
सर्ग 12 - युद्धकाण: द्वादशः सर्गः
राम सर्वांचे आभार मानतो, मंदोदरी, बिभीषण ह्यांचा शोक, लक्ष्मणाकडून बिभीषणाचे तर बिभीषणाकडून मंदोदरीचे सांत्त्वन, राम बिभीषणाला रावणाचे उत्तरकार्य करण्यास सांगतो, बिभीषणाला राज्याभिषेक, बिभीषण नजराणे घेऊन रामाकडे येतो, राम सुग्रीवाचे आभार मानतो, रामाज्ञेने मारुती सीतेची भेट घेतो, रामाचा निरोप कळवितो, मारुती रामाकडे येऊन जानकीचा निरोप कळवितो, जानकीला घेऊन येण्यास राम बिभीषणाला सांगतो, सीता येते, राम तिला अभद्र शब्द बोलतो, सीतेचे सर्वांसमक्ष अग्निदिव्य
सर्ग 13 - युद्धकाण: त्रयोदशः सर्गः
सर्व देव रामाची स्तुती करतात, ब्रह्मदेवाचे स्तवन, अग्नि सीतेसह प्रकट होतो, राम सीतेचा स्वीकार करतो, इंद्राकडून रामाची स्तुती, पार्वतीसह शंकर रामाला भेटतात, दशरथभेट, रामाच्या आज्ञेने इंद्र मृत वानरांना जिवंत करतो, रामाच्या आज्ञेने बिभीषणाकडून वानरांचा सत्कार, सर्वांचा निरोप घेऊन राम सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येस निघतो, ‘आम्ही पण अयोध्येला येणार’ असे सर्व सांगतात, राम अनुमती देतो
सर्ग 14 - युद्धकाण्ड: चतुर्दशः सर्गः
मार्गातील विविध स्थाने राम सीतेला दाखवितो, भरद्वाजाश्रमी आगमन, राम भरत, माता इ. ची चौकशी करतो, भरद्वाज सर्वांचे कुशल कळवितो, भरद्वाजाची रामस्तुती व सत्कार, राम मारुतीला भरताकडे पाठवितो, मारुती प्रथम गुहाला भेटतो, नंदिग्रामी भरताची भेट घेतो व रामवार्ता सांगतो, भरताला आनंद, भरत नगर श्रृंगारण्यास सांगतो, राम-भरत भेट, भरत व शत्रुघ्न सर्वांना भेटतात, राम मातांना भेटतो, भरत रामाचे राज्य रामाला परत करतो, राम पुष्पक विमानाला कुबेराकडे जाण्यास सांगतो, गुरु वसिष्ठांची भेट
सर्ग 15 - युद्धकाण्ड: पञ्चदशः सर्गः
राम राज्य स्वीकारतो, त्याचे मंगलस्नान, राजस्त्रिया सीतेला अलंकार घालून सजवितात, राम रथात आरुढ होतो, सर्व अयोध्येस निघतात, रामाचा नगरप्रवेश, राम कौसल्या व इतर मातांची भेट घेतो, रामाज्ञेने भरत सर्वांना मंदिरे राहण्यास देतो, भरत चतुःसिंधुंचे जल आणवितो, रामराज्याभिषेक समारंभ, शंकर पार्वतीसह रामास भेटण्यास येतो, शंकराकडून रामस्तुती, इंद्राची रामस्तुती, यक्ष-गंधर्व-पितर यांचेकडून रामस्तुती, सर्वत्र आनंदीआनंद
सर्ग 16 - युद्धकाण्ड: षोडशः सर्गः
रामराज्यात सर्वत्र कुशलमंगल, राम दानधर्म करतो, मारुतीला वरदान, गुह राजाची भेट, राम गुहाला भूषणे, राज्य देतो, सुग्रीवादिकांचा सत्कार करतो, बिभीषण लंकेस जातो, राम उत्तमप्रकारे राज्य करतो, लक्ष्मणाला यौवराज्याभिषेक, राम दहा हजार वर्षे राज्य करतो, रामायणमाहात्म्य