..................किष्किन्धाकाण्ड (सर्ग 1 ते 9)..................
सर्ग 1 - किष्किन्धाकाण्ड: प्रथमः सर्गः
राम पंपा सरोवरावर येतो, सुग्रीवाला रामदर्शन होते, तो भयाने मारुतीला शोध घेण्यास पाठवितो, मारुती बटुरुपाने येतो व युक्तिने रामलक्ष्मणांना सुग्रीवाला भेटवितो, राम व सुग्रीव ह्यांची मैत्री, लक्ष्मण सुग्रीवाला रामवृत्तांत सांगतो, सुग्रीव सीतेच्या शोधाच्या कामी साह्य करण्याचे कबूल करतो, शोकग्रस्त सीतेने टाकलेले दागिने सुग्रीव दाखवतो, दागिने वक्षस्थलाशी कवटाळून राम शोक करतो, लक्ष्मणाकडून रामाचे सांत्त्वन, जानकीचा शोध घेण्याची व रावणाचा वध करण्याची सुग्रीवाची प्रतिज्ञा, राम-सुग्रीवाचे अग्निसाक्षिक आलिंगन, सुग्रीवाचा वृत्तांत, वालीला मारण्याची रामाची प्रतिज्ञा, वालीचा पराक्रम व त्याला मिळालेला शाप सुग्रीव रामाला सांगतो, राम दुंदुभीचे शरीर पायाने झुगारून देतो व सात तालवृक्षांचा भेद करतो, सुग्रीव रामाची स्तुति करतो
सर्ग 2 - किष्किन्धाकाण्ड: द्वितीयः सर्गः
सुग्रीवाचे वालीला युद्धासाठी आव्हान, वाली-सुग्रीवाचे युद्ध, सुग्रीवाचा पराजय, त्याची करुणापूर्वक रामाला विनवणी, राम ओळखीकरिता सुग्रीवाच्या अंगावर चिह्न करतो, वालीला पुन्हा युद्धासाठी आव्हान, ताराचा वालीला युद्धापासून परावृत करण्याचा प्रयत्न, वाली तारेची समजूत घालतो, वाली-सुग्रीवाचे पुन्हा युद्ध, रामबाणाने वाली पडतो, वाली अग्रभागी रामाला पाहून त्याची निंदा करतो, रामाचे वालीला उत्तर, वाली रामाला शरण येतो व सद्गती मिळवतो.
सर्ग 3 - किष्किन्धाकाण्ड: तृतीयः सर्गः
तारेला वालीवधाची वार्ता कळते-तिचा शोक, रामाकडून तारेचे सांत्त्वन, तारा जीवनमुक्त होते, सुग्रीवाचा अज्ञाननाश, सुग्रीवाकडून वालीचे उत्तरकार्य, राम सुग्रीवाची समजूत घालतो, राम त्याला राज्याभिषेक व अंगदाला यौवराज्याभिषेक करवितो, रामाचे प्रस्त्रवण पर्वतावर गमन व तेथे वास्तव्य
सर्ग 4 - किष्किन्धाकाण्ड: चतुर्थः सर्गः
प्रस्त्रवण पर्वतावरील रमणीय देखावा, लक्ष्मणास राम कर्मोपासना सांगतो, रामाची सीतेबद्दलची चिंता, सुग्रीवाची मारुतीकडून कानउघाडणी, सुग्रीवाज्ञेने मारुती सर्वत्र दूत पाठवितो
सर्ग 5 - किष्किन्धाकाण्ड: पञ्चमःसर्गः
रामाचा शोक, लक्ष्मण रामाज्ञेने किष्किन्धेला जातो, रामाचे सत्यस्वरूप, क्रोधसंतप्त लक्ष्मणाला अंगद भेटतो, लक्ष्मण आल्याचे अंगद सुग्रीवाला कळवितो, अंगद व मारुती ह्यांना सुग्रीव लक्ष्मणाकडे पाठवितो, लक्ष्मण सुग्रीवाच्या राजवाड्यात येतो, तारा लक्ष्मणाचे सांत्त्वन करते, लक्ष्मण सुग्रीवाला भेटतो व त्याची कानउघाडणी करतो, सुग्रीव लक्ष्मणाचा सत्कार करतो व रामाला भेटण्यास जातो
सर्ग 6 - किष्किन्धाकाण्ड: षष्ठः सर्गः
राम-सुग्रीव भेट, सुग्रीव आपल्या वानरसेनेचे वर्णन करतो, रामाज्ञेने सुग्रीव सीताशोधार्थ सर्वत्र वानर पाठवितो, राम मारुतीजवळ अंगठी देतो, मारुती व इतर वानर गुहेत शिरतात, गुहेत योगिनीची भेट, मारुती आपला वृत्तांत योगिनीला सांगतो व ती ही आपला वृत्तांत सांगते, वानर गुहेच्या बाहेर येतात, योगिनी रामाकडे येते व त्याचे स्तवन करते, राम तिला बदरीवनात पाठवितो, तिला मुक्ति मिळते
सर्ग 7 - किष्किन्धाकाण्ड: सप्तमः सर्गः
सीता न सापडल्यामुळे वानरांची निराशा, अंगदाचा शोक, मारुती अंगदाची समजूत घालतो, वानर महेन्द्र पर्वतावर व तेथून समुद्रतीरावर जातात, वानर मरण्यास सिद्ध होतात, संपातिची भेट, अंगद त्याला सर्व वृत्तांत सांगतो, संपाति जटायुच्या वार्तेने आनंदतो, तो लंका, अशोकवन ह्यांची माहिती वानरांना सांगतो
सर्ग 8 - किष्किन्धाकाण्ड: अष्टमः सर्गः
संपाति त्याची व जटायुची पूर्वकथा सांगतो, लंकेचा मार्ग सांगून तेथून निघून जातो
सर्ग 9 - किष्किन्धाकाण्ड: नवमः सर्गः
संपाति गेल्यावर समुद्र तरून जाण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे ह्याची चर्चा वानर करतात, प्रत्येकाच्या बळाची विचारणा, जांबवान मारुतीचे नाव सुचवितो, मारुतीला स्फुरण चढते, जांबवान मारुतीला आशीर्वाद देतो, मारुतीचे प्रचंड रूप