मंगलाचरण, उपोद्घात, कलियुगमहिमा, अध्यात्मरामायणाचे माहात्म्य, रामहृदयमाहात्म्य
रामगीता माहात्म्य (सर्ग 1 ते 14)
......................बालकाण्ड (सर्ग 1 ते 7)......................
सर्ग 1 - बालकाण्ड:- प्रथमः सर्गः 1
नमन, रामायणपाठाचे फळ, पार्वतीचा प्रश्न, रामहृदय प्रस्तावना, रामहृदय
सर्ग 2 - बालकाण्ड: - द्वितीय: सर्ग: 2
रामकथेची प्रस्तावना, पृथ्वीसह ब्रह्मदेवाचे विष्णुकडे गमन, ब्रह्मदेवाचे विष्णुस्तोत्र, अवतारकथन, देवांना वानर होण्याविषयी ब्रह्मदेवाची आज्ञा
सर्ग 3 - बालकाण्ड:- तृतीय: सर्ग: 3
दशरथाचा पुत्रप्राप्तीसाठी वसिष्ठांना प्रश्न, वसिष्ठ पुत्रकामेष्टि यज्ञ करवितात, कौसल्येच्या पोटी रामजन्म, कौसल्येचे विष्णुस्तोत्र, अवताराचे कारण, बाललीला, भरत-लक्ष्मण-शत्रुघ्न यांचे जन्म, पुत्रांचे नामकरण, बालपण, उपनयन, अध्ययन व नित्यक्रम
सर्ग 4 - बालकाण्ड: - चतुर्थ: सर्ग: 4
विश्वमित्रागमन व रामाची मागणी, वसिष्ठांच्या संमतीने विश्वामित्र रामलक्ष्मणांना नेतो, त्राटिकावध, रामाला अस्त्रविद्यादान
सर्ग 5 - बालकाण्ड: पञ्चम सर्ग: 5
सिद्धाश्रमी आगमन, मारिच-सुबाहु वध, विदेह देशाला प्रयाण, गौतमाश्रमी राम येतो-तेथील वृत्तांत, अहल्योद्धार, अहल्याकृत स्तवन
सर्ग 6 - ॥बालकाण्ड: - षष्ठ: सर्ग: 6
मिथिलेला जाताना नाविकाकडून अडथळा, नाविकाचा भाव, मिथिलेत रामागमन, जनकाकडून सत्कार, शिवचापभंग, सीतास्वयंवर, दशरथागमन, चौघा बंधुंचे विवाह, सीतेचा वृत्तांत, जनककृत रामस्तुति, सीता व राम ह्यांची अयोध्येला पाठवणी
सर्ग 7 - बालकाण्ड: - सप्तम: सर्ग: 7
परशुरामदर्शन व त्यांचे भाषण, रामाचे भार्गवाला उत्तर, परशुरामाचा वृत्तांत, परशुरामकृत रामस्तवन, रामाज्ञेने परशुराम महेन्द्र पर्वतावर जातो, दशरथाचे परिवारासह अयोध्येला आगमन
....................अयोध्याकाण्ड (सर्ग 1 ते 9)....................
सर्ग 1
नारदागमन व त्याचा सत्कार, नारदकृत स्तवन, नारदागमनाचे कारण, रामाचे आश्वासन
सर्ग 2
राज्याभिषेकाची तयारी, राममंदिरी वसिष्ठांचे आगमन, वसिष्ठांची प्रार्थना, राम लक्ष्मणाला राज्याभिषेकाची वार्ता सांगतो, दशरथ रामाभिषेकाचे वसिष्ठांशी बोलतो, मातांचा आनंद, आकाशवाणी, मंथरेच्या अंगात संचार व कैकेयीची कानउघाडणी, कैकेयी मंथरेच्या सांगण्यानुसार वागते.
सर्ग 3
कैकेयीला दुःखी पाहून दशरथाची दीनवाणी स्थिती, कैकेयी देऊ केलेले वर मागते, दशरथ घाबरून विनवणी करतो, कैकेयी हट्ट सोडीत नाही, दशरथाची दुःखस्थिती, लोकांची उत्कंठा, सुमंत्र राजाकडे जातो, दशरथ सुमंत्राकरवी रामाला आणवितो, दशरथ मूर्च्छित होतो, कैकेयी सर्व वृत्तांत रामाला सांगते, राम तिचे म्हणणे मान्य करतो, कैकेयी रामाला वनवास व भरताला राज्य मागून घेते, दशरथ रामाला भेटतो व त्याचा शोक, रामाचे आश्वासन, कौसल्या व सीता ह्यांची भेट.
सर्ग 4
राम कौसल्येला भेटतो, कौसल्येचे आवेशयुक्त भाषण, लक्ष्मणाचा संताप, रामाचा लक्ष्मणास उपदेश, कौसल्येचे सांत्त्वन, कौसल्येचा आशीर्वाद, लक्ष्मण-सीतेचा रामाबरोबर वनात जाण्याचा निश्चय, सीतेचा निर्धार, सीतेने जाताना केलेला दानधर्म, राम-सीता-लक्ष्मण दशरथाकडे जातात.
सर्ग 5
नागरिकांचे दुःखाचे उद्गार, वामदेव व मुनि सांत्त्वन करतात, राम हाच विष्णु होय, अशी वामदेवांच्या सांगण्यावरून खात्री होते, राम सीतेसह कैकेयीकडे जातो व निरोप घेतो, वनाला प्रयाण, पौरांचा रामाला परतविण्याचा प्रयत्न, दशरथाची मूर्च्छा, तमसा नदीवर वास, युक्तिने पौरांना परतविले, श्रृंगवेरपुराजवळ गुहाची भेट, गुह रामाला राज्य अर्पण करतो, राम गुहाची समजूत घालतो, वडाच्या चिकाने जटा बांधणे व पर्णशय्येवर निजणे.
सर्ग 6
गुहाचा लक्ष्मणाशी संवाद, नौकेत बसून गंगापार जातात, गुहाला राम परतवितो, भरद्वाजाश्रमी आगमन व सत्कार, भरद्वाजाकडून रामस्तुती, भरद्वाजाचा निरोप घेऊन वाल्मीकीच्या आश्रमी आगमन, वाल्मीकीने केलेला रामस्तव, वाल्मीकींचा वृत्तांत, रामाचा चित्रकूट पर्वतावर निवास
सर्ग 7
सुमंत्र परत येऊन दशरथाला भेटतो, दशरथाचा शोक, सुमंत्र सर्व वृत्तांत सांगतो, कौसल्येचे टोचून बोलणे, शापाची आठवण व श्रावणकथा, पुन्हा शोक व मृत्यु, वसिष्ठ भरताला आणवितो, कैकेयीकडून सर्व वृत्तांत कळतो, भरताचा शोक व संताप, भरत कौसल्येला भेटतो, वसिष्ठांचा बोध, दशरथाची उत्तरक्रिया, रामामागून जाण्याचा निश्चय
सर्ग 8
भरताला राज्यदान-त्याचे उद्गार, भरत, माता, वसिष्ठ वगैरे रामाकडे जातात, गुहाची भेट, गंगा उतरून भरद्वाजाश्रमी आगमन व दोघांचा संवाद, भरत चित्रकूट पर्वतावर जातो
सर्ग 9
राम-भरत भेट, पित्याच्या मृत्युची वार्ता ऐकून राम शोक करतो, राज्य स्वीकारण्याविषयी भरताची रामाला प्रार्थना, राम भरताची समजूत घालतो, भरताचा निश्चय, वसिष्ठांचा भरताला उपदेश, भरत रामाच्या पादुका घेऊन अयोध्येला निघतो, कैकेयी रामाची क्षमा मागते, रामाचा कैकेयीला उपदेश, भरत रामपादुका सिंहासनी ठेवून राज्य करतो, राम अत्रि ऋषींच्या आश्रमी येतो, सीता-अनसूया भेट, अत्रि ऋषी रामाची स्तुती करतात
....................अरण्यकाण्ड (सर्ग 1 ते 10).....................
सर्ग 1
राम नदी उतरून अरण्यात जातो, विराध राक्षसाची भेट, रामाकडून त्याचा वध, देवगंधर्वांना आनंद, विराध-एक शापभ्रष्ट गंधर्व, विराधाने केलेली रामस्तुती, रामाचे विराधाला वरदान
सर्ग 2
राम-लक्ष्मण-सीतेचे शरभंग आश्रमात आगमन, रामाला तपश्चर्येचे फळ, शरभंगांचे चितारोहण, शरभंग रामाची स्तुती करतात, दण्डकारण्यवासी मुनींचे रामस्तवन, मुनिवने पाहून राक्षसवधाची रामप्रतिज्ञा, सुतिक्ष्णाच्या आश्रमी रामाचे आगमन, सुतिक्ष्णाकडून रामस्तुती, राम सुतिक्ष्णाची स्तुती करतो, रामाचे अगस्त्याश्रमाकडे प्रस्थान
सर्ग 3
सुतिक्ष्णासह रामाचे अगस्त्याश्रमी आगमन, अगस्त्य व राम ह्यांची भेट, अगस्ती ऋषिंकडून रामाचे स्तवन, अगस्त्य रामाला धनुष्य, भाते व खङ्ग देतो व पंचवटीत राहण्यास सांगतो
सर्ग 4
जटायुची भेट, पंचवटीत रामाचे राहाणे, लक्ष्मणाला रामाचा उपदेश
सर्ग 5
शूर्पणखा कामपीडित होऊन रामाकडे येते, राम तिला लक्ष्मणाकडे पाठवितो, ती पुन्हा रामाकडे येते, रामाज्ञेने लक्ष्मणाहाती तिची विटंबना, खर व अनेक राक्षसांचा रामाकडून त्यांचा वध, सीतेचा आनंद, शूर्पणखा रावणाकडे जाऊन रामाचा वृत्तांत सांगते, रावणाचे चिंतन
सर्ग 6
रावण मारिचाकडे जातो, मारिचाची ध्यानावस्था, रावणाला कुशलप्रश्न, रावण रामाची कथा सांगून साहाय्य मागतो, मारिचाचा रावणास बोध, रावणाचे प्रत्युत्तर, रामाहाती मरणे पसंत करून मारिच सुवर्णमृग होतो
सर्ग 7
रामाज्ञेने सीता अग्नीत गुप्त होते, राम मायिक सीता आश्रमात ठेवतो, रामाकडे क्रीडार्थ सुवर्णमृगाची तिची मागणी, लक्ष्मणाला सीतेच्या रक्षणार्थ ठेवून राम सुवर्णमृगामागे जातो, मृगाला मायावी राक्षस जाणून राम त्याच्यावर बाण सोडतो, रामाच्या आवाजात ‘मेलो’ म्हणून मारिच ओरडतो, त्याला सद्गती मिळते, राम सीतेच्या काळजीने मागे फिरतो, रामाच्या शोधार्थ लक्ष्मण जात नाही म्हणून सीता त्याजवर रागावते, सीतेला वनदेवतांच्या स्वाधीन करून लक्ष्मण रामाकडे जातो, रावण भिक्षूवेषाने रामाश्रमी येतो, सीतेचा व त्याचा संवाद, रावण सीतेला घेऊन जातो, जटायु-रावणाचे युद्ध, जटायु घायाळ होऊन पडतो, रावण सीतेला आकाशमार्गाने नेतो, ऋष्यमूक पर्वतावर पाच वानरांना पाहून सीता दागिने टाकते, रावण सीतेला लंकेतील अशोकवनात ठेवतो
सर्ग 8
राम लक्ष्मणाला पाहून मनात विचार करतो, तो लक्ष्मणावर रागावतो, रामाचा सीतेकरिता शोक, लक्ष्मणासह सीतेचा शोध, जटायुची भेट व रामाला प्रार्थना, जटायुची उत्तरक्रिया, जटायुला दिव्यस्वरूप प्राप्ति, त्याने केलेली स्तुती, रामाची प्रसन्नता व जटायुला विष्णुपदाची प्राप्ति
सर्ग 9
कबंधाची भेट, राम-लक्ष्मण त्याचे बाहू तोडून टाकतात, कबंधाचा वृत्तांत, त्याची रामास प्रार्थना, कबंधाच्या दहनानंतर त्याच्या शरीरातून गंधर्व प्रकट होतो व रामाची स्तुती करतो, कबंधाला स्वर्लोकप्राप्ति
सर्ग 10
राम शबरीच्या आश्रमात येतो, शबरीचा वृत्तांत, रामाचा तिला उपदेश, शबरी सीतेची वार्ता सांगते, शबरीचा अग्निप्रवेश व तिला मुक्तिप्राप्ति, भक्तिचे माहात्म्य
..................किष्किन्धाकाण्ड (सर्ग 1 ते 9)..................
सर्ग 1
राम पंपा सरोवरावर येतो, सुग्रीवाला रामदर्शन होते, तो भयाने मारुतीला शोध घेण्यास पाठवितो, मारुती बटुरुपाने येतो व युक्तिने रामलक्ष्मणांना सुग्रीवाला भेटवितो, राम व सुग्रीव ह्यांची मैत्री, लक्ष्मण सुग्रीवाला रामवृत्तांत सांगतो, सुग्रीव सीतेच्या शोधाच्या कामी साह्य करण्याचे कबूल करतो, शोकग्रस्त सीतेने टाकलेले दागिने सुग्रीव दाखवतो, दागिने वक्षस्थलाशी कवटाळून राम शोक करतो, लक्ष्मणाकडून रामाचे सांत्त्वन, जानकीचा शोध घेण्याची व रावणाचा वध करण्याची सुग्रीवाची प्रतिज्ञा, राम-सुग्रीवाचे अग्निसाक्षिक आलिंगन, सुग्रीवाचा वृत्तांत, वालीला मारण्याची रामाची प्रतिज्ञा, वालीचा पराक्रम व त्याला मिळालेला शाप सुग्रीव रामाला सांगतो, राम दुंदुभीचे शरीर पायाने झुगारून देतो व सात तालवृक्षांचा भेद करतो, सुग्रीव रामाची स्तुति करतो
सर्ग 2
सुग्रीवाचे वालीला युद्धासाठी आव्हान, वाली-सुग्रीवाचे युद्ध, सुग्रीवाचा पराजय, त्याची करुणापूर्वक रामाला विनवणी, राम ओळखीकरिता सुग्रीवाच्या अंगावर चिह्न करतो, वालीला पुन्हा युद्धासाठी आव्हान, ताराचा वालीला युद्धापासून परावृत करण्याचा प्रयत्न, वाली तारेची समजूत घालतो, वाली-सुग्रीवाचे पुन्हा युद्ध, रामबाणाने वाली पडतो, वाली अग्रभागी रामाला पाहून त्याची निंदा करतो, रामाचे वालीला उत्तर, वाली रामाला शरण येतो व सद्गती मिळवतो.
सर्ग 3
तारेला वालीवधाची वार्ता कळते-तिचा शोक, रामाकडून तारेचे सांत्त्वन, तारा जीवनमुक्त होते, सुग्रीवाचा अज्ञाननाश, सुग्रीवाकडून वालीचे उत्तरकार्य, राम सुग्रीवाची समजूत घालतो, राम त्याला राज्याभिषेक व अंगदाला यौवराज्याभिषेक करवितो, रामाचे प्रस्त्रवण पर्वतावर गमन व तेथे वास्तव्य
सर्ग 4
प्रस्त्रवण पर्वतावरील रमणीय देखावा, लक्ष्मणास राम कर्मोपासना सांगतो, रामाची सीतेबद्दलची चिंता, सुग्रीवाची मारुतीकडून कानउघाडणी, सुग्रीवाज्ञेने मारुती सर्वत्र दूत पाठवितो
सर्ग 5
रामाचा शोक, लक्ष्मण रामाज्ञेने किष्किन्धेला जातो, रामाचे सत्यस्वरूप, क्रोधसंतप्त लक्ष्मणाला अंगद भेटतो, लक्ष्मण आल्याचे अंगद सुग्रीवाला कळवितो, अंगद व मारुती ह्यांना सुग्रीव लक्ष्मणाकडे पाठवितो, लक्ष्मण सुग्रीवाच्या राजवाड्यात येतो, तारा लक्ष्मणाचे सांत्त्वन करते, लक्ष्मण सुग्रीवाला भेटतो व त्याची कानउघाडणी करतो, सुग्रीव लक्ष्मणाचा सत्कार करतो व रामाला भेटण्यास जातो
सर्ग 6
राम-सुग्रीव भेट, सुग्रीव आपल्या वानरसेनेचे वर्णन करतो, रामाज्ञेने सुग्रीव सीताशोधार्थ सर्वत्र वानर पाठवितो, राम मारुतीजवळ अंगठी देतो, मारुती व इतर वानर गुहेत शिरतात, गुहेत योगिनीची भेट, मारुती आपला वृत्तांत योगिनीला सांगतो व ती ही आपला वृत्तांत सांगते, वानर गुहेच्या बाहेर येतात, योगिनी रामाकडे येते व त्याचे स्तवन करते, राम तिला बदरीवनात पाठवितो, तिला मुक्ति मिळते
सर्ग 7
सीता न सापडल्यामुळे वानरांची निराशा, अंगदाचा शोक, मारुती अंगदाची समजूत घालतो, वानर महेन्द्र पर्वतावर व तेथून समुद्रतीरावर जातात, वानर मरण्यास सिद्ध होतात, संपातिची भेट, अंगद त्याला सर्व वृत्तांत सांगतो, संपाति जटायुच्या वार्तेने आनंदतो, तो लंका, अशोकवन ह्यांची माहिती वानरांना सांगतो
सर्ग 8
संपाति त्याची व जटायुची पूर्वकथा सांगतो, लंकेचा मार्ग सांगून तेथून निघून जातो
सर्ग 9
संपाति गेल्यावर समुद्र तरून जाण्याचे कोणाचे सामर्थ्य आहे ह्याची चर्चा वानर करतात, प्रत्येकाच्या बळाची विचारणा, जांबवान मारुतीचे नाव सुचवितो, मारुतीला स्फुरण चढते, जांबवान मारुतीला आशीर्वाद देतो, मारुतीचे प्रचंड रूप
......................सुंदरकाण्ड (सर्ग 1 ते 5).....................
सर्ग 1
मारुतीची उडी, त्याची परीक्षा पाहण्यासाठी देव सुरसेला पाठवितात, मारुती व सुरसा ह्यांचा संवाद, मारुती तिच्या तोंडात जाऊन बाहेर येतो, आकाशमार्गाने जात असता समुद्राच्या सांगण्यावरून मैनाक पर्वत त्याला आपल्या शिखरावर विश्रांती घेण्यास सांगतो, मारुती त्याला स्पर्श करून पुढे जातो, सिंहिकेचा वध, मारुती त्रिकूट पर्वतावर येतो, सूक्ष्मरुपाने लंकेत प्रवेश, लंकिनी मारुतीला अडविते, मारुती तिच्यावर मुष्टिप्रहार करतो, ती सीतेची माहिती सांगते, सीता व रावण ह्यांचे डोळे एकाच वेळी स्फुरण पावतात
सर्ग 2
मारुतीचा सूक्ष्मरूपाने अशोकवनात प्रवेश, तेथील शिंशपावृक्षाखाली मारुतीला सीतादर्शन, तो लपून बसतो, रावणाला मारुती पाहतो, रावण रामाची निंदा सीतेला ऐकवितो, सीता रावणाची निर्भत्सना करते, रावण सीतेच्या अंगावर धावून जातो, मंदोदरी निवारण करते, रावणाच्या सांगण्यावरून राक्षसी सीतेला छळतात, त्रिजटा राक्षसींचा प्रतिकार करते, सीता दुःखाने गळफास घेण्याचा विचार करते
सर्ग 3
मारुती सीतेला ऐकू जाईल अशा आवाजात रामचरित्र गातो, सीतेला आनंद होतो, मारुती सीतेपुढे येऊन वंदन करतो-तिला खुणेची अंगठी देतो, सीता मारुतीची प्रशंसा करते, सीता खुणेची वस्तू म्हणून चुडामणी देते, खुणेची गोष्ट म्हणून काककथा सांगते, मारुती तिला आश्वासन देतो, मारुती फळे खातो व अशोकवनिका निर्वृक्ष करतो, राक्षसी मारुतीला पाहतात, रावणाला त्याने केलेली नासाडी कळवितात, रावण मारुतीवर अनेक राक्षस, सेनापती व मंत्री पाठवतो, मारुती त्यांचा वध करतो, रावणपुत्र अक्षाचा वध, रावण इंद्रजिताला मारुतीवर पाठवितो, इंद्रजित मारुतीला बांधून घेऊन जातो
सर्ग 4
मारुतीला बांधून सभेत आणतात, रावणाच्या सांगण्यावरून प्रहस्त मारुतीला त्याचा वृत्तांत विचारतो, मारुतीचा रावणाला उपदेश, रावण संतापतो, वानराचे तुकडे करण्यास सांगतो, बिभीषण त्याचे निवारण करतो, मारुतीच्या शेपटीला तेल लावून आग लावतात, सूक्ष्मरूप घेऊन मारुती बंधनमुक्त होतो, पुन्हा विशालरूप घेऊन लंकादहन करतो, अग्नि हा वायुचा मित्र असल्यामुळे व नामस्मरणामुळे शेपटी जळत नाही
सर्ग 5
मारुती सीतेचा निरोप घेऊन निघतो, मारुतीला पाहून वानर आनंदित होतात, ते रामसुग्रीवाला भेटण्यासाठी निघतात, मधुवनात शिरून वनाचा विध्वंस, दधिवक्र सुग्रीवाकडे कागाळी करतो, मारुतीला सीता सापडल्याची सुग्रीवाची खात्री होते, सुग्रीव वानरांना पाचारण करतो, मारुती रामाला सीतेचे वृत्त सांगतो, राम मारुतीचे आभार मानतो, मारुतीची योग्यता
......................युद्धकाण्ड (सर्ग 1 ते 16).....................
सर्ग 1
राम मारुतीची प्रशंसा करतो, समुद्र कसा तरावा ह्याविषयी रामाला काळजी, राम मारुतीला लंकेचे स्वरूप विचारतो, मारुतीचे लंकावर्णन, सर्वांना घेऊन राम लंकेकडे निघतो, सैन्य कोठेही न थांबता समुद्रतीरावर येऊन थांबते, तेथे सैन्याचा तळ देतात, समुद्र पाहून सर्व खिन्न होतात, रामाचा सीतेकरिता मायावी शोक
सर्ग 2
मारुतीच्या पराक्रमाने रावण लज्जित होतो, रावणसभेत राक्षस रावणाला उत्तेजन देतात, कुंभकर्णाशी रावणाची मसलत, इंद्रजित लढाईवर जाण्यासाठी अनुज्ञा मागतो, बिभीषणाचा उपदेश, रावण बिभीषणाला धिक्कारतो, बिभीषणाचा पुन्हा उपदेश, रावणाचा त्याग व रामाकडे जाणे
सर्ग 3
बिभीषण चार मंत्र्यांसह रामाकडे येतो, सुग्रीवाची बिभीषणाबद्दल शंका, राम सुग्रीवाची समजूत काढून बिभीषणाला जवळ बोलावितो, राम-बिभीषण भेट, बिभीषण रामाची स्तुती करतो, राम प्रसन्न होतो, बिभीषण भक्ति व ज्ञान मागतो, रामाकडून बिभीषणाला लंकेचा राज्याभिषेक, सुग्रीव-बिभीषणाची मैत्री, रावणाकडून आलेल्या शुकाचा फितुरीचा प्रयत्न, वानर त्याजवर धावतात, राम निवारण करतो, सुग्रीवाचा शुकाला निरोप, शार्दुलाच्या वार्तेने रावणाला चिंता, राम समुद्रावर जातो, समुद्र रामाला शरण येतो, समुद्राने केलेली रामस्तुती, रामाचा अमोघ बाण, आभीरांचा नाश, नलाने सेतू बांधावा म्हणून समुद्राचा सल्ला, नल सेतू बांधतो
सर्ग 4
रामेश्वराची स्थापना, राम सेतू ओलांडून सुवेळ पर्वताला वेढा घालतो, पर्वतावरून लंका पाहतात, शुक रावणाला निरोप सांगून उपदेश करतो
सर्ग 5
शुकावर रागावून रावण त्याला घालवून देतो, शुकाचा वृत्तांत, माल्यवान लंकेतील अपशकून सांगतो व रामाला शरण जाण्याचा उपदेश करतो, माल्यवानाचा रावणाकडून धिक्कार, रावणाची राक्षसांना युद्धास जाण्याची आज्ञा, राम बाणाने दहाही मुकुटांचा छेद करतो, रावण प्रहस्तादिकांना रामावर पाठवितो, वानरांचा लंकेला वेढा, तुमुल युद्ध, रावणसैन्याचा चौथा भाग राहातो, इंद्रजित वानरांवर चालून येतो, वानर युद्धात पडतात, द्रोणगिरी आणण्यासाठी राम मारुतीला पाठवतो, मारुती द्रोणाचल आणतो, वानर उठतात, रावण सर्व सेनापतींना युद्धावर पाठवितो, ते वानरसेनेचा नाश करतात, रामशक्तिमुळे वानर बलाढ्य होतात
सर्ग 6
रावण युद्धक्षेत्री येतो, मयशक्ति बिभीषणावर टाकतो, ती लक्ष्मणाला लागते, मारुती रावणाच्या वक्षावर प्रहार करतो, रावणाची दुर्दशा, मारुती लक्ष्मणाला रामाकडे आणतो, शक्ति रावणाच्या रथावर जाते, रावण रामावर धावून येतो, रामरावणाचे प्रथम युद्ध, रामाज्ञेने मारुती ओषधि आणण्यास जातो, मारुतीला अडथळा करण्याकरिता रावण कालनेमीची योजना करतो, कालनेमीचा रावणाला उपदेश
सर्ग 7
कालनेमीवर रावण संतापतो, कालनेमी रावणाला वश होतो, कालनेमीचे तपोवन, मारुतीची कालनेमीशी तपोवनात भेट, मारुतीशी कालनेमीचे कपटी संभाषण, मारुती महाकाय मगरीला मारतो, मगरी अप्सरारुपात प्रकट होते, धान्यमाली कालनेमीचा वृत्तांत सांगते, मारुती कालनेमीचा वध करतो, मारुती ओषधि घेऊन येतो व लक्ष्मण शुद्धिवर येतो, राम पुन्हा युद्धासाठी सज्ज होतो, रावण रामबाणाने विद्ध होतो, तो अनरण्याची कथा असुरांना सांगतो, रावण कुंभकर्णाला उठवून आणवितो, रावण त्याला सर्व वृत्त सांगतो, कुंभकर्णाचा उपदेश
सर्ग 8
कुंभकर्णावर रावण संतापतो, कुंभकर्ण युद्धासाठी जातो, वानर भयभीत होतात, बिभीषण त्याला भेटून आपली कथा सांगतो, कुंभकर्ण बिभीषणाला आलिंगन देऊन निरोप देतो, कुंभकर्ण वानरांचा नाश करतो, राम व कुंभकर्णामध्ये घनघोर युद्ध, कुंभकर्णाचा वध, देवगंधर्वांची रामावर पुष्पवृष्टि, नारद येऊन रामाची स्तुती करतो, रावणाचा शोक, इंद्रजित त्याचे सांत्त्वन करतो आणि निकुंभिलेत होम आरंभितो, बिभीषण ती वार्ता रामाला कळवितो व लक्ष्मणास पाठविण्याची प्रार्थना करतो
सर्ग 9
राम बिभीषणाबरोबर लक्ष्मणास पाठवितो, लक्ष्मणाचा उत्साह, हनुमान, अनेक वानर यांसह लक्ष्मण इंद्रजितावर चालून जातो, इंद्रजितावर बाणांची वृष्टि करतो, वानरांचे व राक्षसांचे तुमुल युद्ध होते, होम अर्धवट टाकून इंद्रजित लक्ष्मणावर धावून येतो, बिभीषणाची निर्भत्सना करतो, लक्ष्मण व इंद्रजिताचे युद्ध, इंद्रजिताचे कवच फाटते, लक्ष्मणाचे कवच खाली पडते, अनिश्चित स्वरूपात लढाई, लक्ष्मण इंद्रजिताचे धनुष्य, रथ, घोडे ह्यांचा नाश करतो, इंद्रजितही दुसरे धनुष्य घेऊन वानरांची दाणादाण करतो, लक्ष्मण ऐंद्रास्त्राची योजना करून इंद्रजिताचा वध करतो, देवांचा व वानरांचा आनंद, राम लक्ष्मणाची प्रशंसा करतो, पुत्रवधाची वार्ता ऐकून रावण मूर्च्छित होतो, क्रोधाने सीतेला मारण्यासाठी जातो, सुपार्श्व रावणाचा प्रतिकार करतो
सर्ग 10
उरलेल्या राक्षसांसहित रावण रामावर चालून जातो, रामाच्या बाणाने घायाळ होऊन लंकेला जातो, रावण-शुक्राचार्य यांची भेट, शुक्राचार्य रावणाला होम करण्यास सांगतो, बिभीषण ती वार्ता रामास कळवितो, अंगदादि वानर होमाचा विध्वंस करण्यासाठी लंकेत जातात, सरमा होमस्थान दाखवते, होमाचा विध्वंस, मंदोदरीची विटंबना व तिचा शोक, अनुष्ठान सोडून रावण तिचे सांत्त्वन करतो, मंदोदरीचे रावणाला उद्देशून भाषण, रावण आपला उद्देश कळवितो
सर्ग 11
रावण युद्धाला निघतो, रावणाचे मारुतीशी युद्ध, रावणाच्या मुष्टिप्रहाराने मारुती मूर्च्छित होतो, सावध होऊन पुन्हा लढतो, रामरावणाचे भयंकर युद्ध, इंद्र मातलीबरोबर दिव्य रथ पाठवितो, राम-रावणाचे अस्त्रांवर अस्त्रे टाकून भयंकर युद्ध होते, राम विव्हल झाल्याचे पाहून देवादिकांना खेद होतो, राम इंद्रधनुष्यासारखे धनुष्य घेऊन रावणावर बाण सोडतो व त्याची मस्तके तोडतो, मस्तके पुन्हा जोडली जातात, रावणाच्या नाभीस्थानी असलेले अमृत आग्नेयास्त्राने सुकविण्याची सूचना बिभीषण देतो, राम रावणाच्या नाभीचा छेद करतो, रावणावर ब्रह्मास्त्र सोडण्याची सूचना मातली देतो, राम निर्वाणीचा बाण सोडतो, रावण गतप्राण होतो, राक्षससेना पळत सुटते, रावणाच्या शरीरातून तेज निघून ते रामरुपी विलिन होते, देव आश्चर्य करतात, रावणाची विरोधभक्ती, नारदाची प्रार्थना
सर्ग 12
राम सर्वांचे आभार मानतो, मंदोदरी, बिभीषण ह्यांचा शोक, लक्ष्मणाकडून बिभीषणाचे तर बिभीषणाकडून मंदोदरीचे सांत्त्वन, राम बिभीषणाला रावणाचे उत्तरकार्य करण्यास सांगतो, बिभीषणाला राज्याभिषेक, बिभीषण नजराणे घेऊन रामाकडे येतो, राम सुग्रीवाचे आभार मानतो, रामाज्ञेने मारुती सीतेची भेट घेतो, रामाचा निरोप कळवितो, मारुती रामाकडे येऊन जानकीचा निरोप कळवितो, जानकीला घेऊन येण्यास राम बिभीषणाला सांगतो, सीता येते, राम तिला अभद्र शब्द बोलतो, सीतेचे सर्वांसमक्ष अग्निदिव्य
सर्ग 13
सर्व देव रामाची स्तुती करतात, ब्रह्मदेवाचे स्तवन, अग्नि सीतेसह प्रकट होतो, राम सीतेचा स्वीकार करतो, इंद्राकडून रामाची स्तुती, पार्वतीसह शंकर रामाला भेटतात, दशरथभेट, रामाच्या आज्ञेने इंद्र मृत वानरांना जिवंत करतो, रामाच्या आज्ञेने बिभीषणाकडून वानरांचा सत्कार, सर्वांचा निरोप घेऊन राम सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येस निघतो, ‘आम्ही पण अयोध्येला येणार’ असे सर्व सांगतात, राम अनुमती देतो
सर्ग 14
मार्गातील विविध स्थाने राम सीतेला दाखवितो, भरद्वाजाश्रमी आगमन, राम भरत, माता इ. ची चौकशी करतो, भरद्वाज सर्वांचे कुशल कळवितो, भरद्वाजाची रामस्तुती व सत्कार, राम मारुतीला भरताकडे पाठवितो, मारुती प्रथम गुहाला भेटतो, नंदिग्रामी भरताची भेट घेतो व रामवार्ता सांगतो, भरताला आनंद, भरत नगर श्रृंगारण्यास सांगतो, राम-भरत भेट, भरत व शत्रुघ्न सर्वांना भेटतात, राम मातांना भेटतो, भरत रामाचे राज्य रामाला परत करतो, राम पुष्पक विमानाला कुबेराकडे जाण्यास सांगतो, गुरु वसिष्ठांची भेट
सर्ग 15
राम राज्य स्वीकारतो, त्याचे मंगलस्नान, राजस्त्रिया सीतेला अलंकार घालून सजवितात, राम रथात आरुढ होतो, सर्व अयोध्येस निघतात, रामाचा नगरप्रवेश, राम कौसल्या व इतर मातांची भेट घेतो, रामाज्ञेने भरत सर्वांना मंदिरे राहण्यास देतो, भरत चतुःसिंधुंचे जल आणवितो, रामराज्याभिषेक समारंभ, शंकर पार्वतीसह रामास भेटण्यास येतो, शंकराकडून रामस्तुती, इंद्राची रामस्तुती, यक्ष-गंधर्व-पितर यांचेकडून रामस्तुती, सर्वत्र आनंदीआनंद
सर्ग 16
रामराज्यात सर्वत्र कुशलमंगल, राम दानधर्म करतो, मारुतीला वरदान, गुह राजाची भेट, राम गुहाला भूषणे, राज्य देतो, सुग्रीवादिकांचा सत्कार करतो, बिभीषण लंकेस जातो, राम उत्तमप्रकारे राज्य करतो, लक्ष्मणाला यौवराज्याभिषेक, राम दहा हजार वर्षे राज्य करतो, रामायणमाहात्म्य
.....................उत्तरकाण्ड (सर्ग 1 ते 9)......................
सर्ग 1
पार्वती राज्याभिषेकानंतरचे रामवृत्त विचारते, अगस्त्यादि मुनि अभिनंदनार्थ रामभेट घेतात, इंद्रजिताच्या विशेष प्रशंसेचे कारण राम विचारतो, अगस्त्य रावणाची कुळकथा, मातापितरे, बंधुभगिनी यांची माहिती सांगतो
सर्ग 2
अगस्त्य पुढील कुळकथा सांगतात, तिघा भावांची तपश्चर्या तसेच ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यांना दिलेल्या वरांचा वृत्तांत, सुमाली येऊन कुबेराकडून लंका घेण्याचा उपदेश करतो, रावण कुबेराला लंकेतून घालवितो, कुबेर शंकराच्या आश्रयाला जातो, रावणाला राक्षसांकडून लंकेचा राज्याभिषेक, तिघा बंधुंचा विवाह, इंद्रजिताचा जन्म, कुंभकर्णाला निद्रेकरिता गुहेची योजना, ब्राह्मणादिकांना रावणापासून त्रास, कुबेर त्याची कानउघाडणी करतो, रावण कुबेरावर चालून जाऊन त्याच्या पुष्पक विमानाचे हरण करतो, इंद्रजित इंद्राला जिंकून त्याला बांधून आणितो, ब्रह्मदेव इंद्राला सोडवितो, रावणाचा पराक्रम, नंदीकेश्वराचा शाप, रावणाची फजिती, वालीशी मैत्री करून रावण राज्य करतो, अगस्त्यकृत रामस्तुती
सर्ग 3
अगस्त्य वाली व सुग्रीवाची जन्मकथा सांगतो, सीताहरणाची कथा सांगतो, विरोधभक्ति करण्याचा रावण निश्चय करतो
सर्ग 4
नारदमुनी रावणाला भेटतात, अत्यंत बलवान लोकं कोठे आहेत असे रावण विचारतो, नारद श्वेतद्विपात जाण्यास सांगतात, मंत्र्यांबरोबर रावण श्वेतद्विपाला जातो, तेथील स्त्रियांकडून लज्जित होतो, विष्णुच्या हातून मरण यावं या हेतूने रावण सीताहरण करतो, रामाची स्तुती करून अगस्त्य जातो, राम शूद्राला मारून ब्राह्मणपुत्राला जिवंत करतो व संसारी पुरुषाप्रमाणे राम वागतो, सर्वत्र शिवलिंगे स्थापन करतो, रामराज्यवर्णन, राम व सीता ह्यांचे गुणवर्णन, सीतेची रामाला प्रार्थना, रामाचे उत्तर, सीतेसंबंधी दूतवार्ता, सीतात्याग, वाल्मीकीच्या आश्रमात सीतेचा निवास, रामाची विरक्तता
सर्ग 5
लक्ष्मणाला रामाचा उपदेश - रामगीता
सर्ग 6
च्यवनादि मुनि रामाकडे येऊन लवणापासून रक्षण करण्यास सांगतात, त्यांना अभय देऊन राम शत्रुघ्नाला लवणावर पाठवितो, लवणाचा वध, वाल्मीकीच्या आश्रमात रामपुत्र कुशलवांचा जन्म, राम अश्वमेध करतो, कुशलवांना घेऊन वाल्मीकी यज्ञस्थानी येतात, कुशाला ज्ञानोपदेश.
सर्ग 7
कुशलवांच्या मुखाने रामायण ऐकून रामाला आनंद होतो, राम त्यांना दशसहस्त्र द्रव्य देऊ करतो, ते घेत नाहीत, ते सीतेचे पुत्र आहेत असे जाणून राम वाल्मीकींना आणवितो, यज्ञमंडपात वाल्मीकींबरोबर सीता येते, वाल्मीकींचे रामाला उद्देशून भाषण, रामाचे भाषण, ब्रह्मदेवादिक देवांचे आगमन, सीतेचे भाषण, सीतेचे भूगर्भात शिरणे, रामाचा सीतेसाठी शोक, कुशलवांना घेऊन राम अयोध्येला येतो, कौसल्येला रामाचा उपदेश, तिन्ही मातांना सद्गती
सर्ग 8
भरताकडून रामाज्ञेने गंधर्व देशातील गंधर्वांचा वध, भरतपुत्र व लक्ष्मणपुत्र ह्यांचे राज्याभिषेक, मुनिवेषधारी कालाचे आगमन, त्याचा सत्कार, रामाबरोबर बोलताना एकांतात तिसरा कुणी आल्यास त्याचा वध करावा असे तो रामास सांगतो, तो ब्रह्मदेवाचा निरोप रामाला कळवितो व रामाचे त्यास उत्तर, दुर्वास मुनिंचे आगमन, रामाला त्वरित भेटण्याची त्यांची इच्छा, लक्ष्मणाची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती, सर्वनाशापेक्षा स्वतःचा नाश होणे बरे असा निश्चय करून त्याचे रामाला भेटणे, दुर्वास मुनिंची कार्यसिद्धि, रामाला आपल्या वचनाची आठवण होते, राम मंत्र्यांचा सल्ला घेतो, लक्ष्मणाचा त्याग, लक्ष्मण शरयूतीरी प्राणत्याग करतो, इंद्र त्याला स्वर्लोकी घेऊन जातो, देवांकडून त्याची पूजा
सर्ग 9
लक्ष्मणाच्या वियोगाने झालेली रामाची मनस्थिती, रामाचा लक्ष्मणामागून जाण्याचा निश्चय, भरताचा शोक, प्रजेची रामावरील भक्ती, कुशलवांना राज्याभिषेक, शत्रुघ्नाला राम बोलावून घेतो, पुत्रांना राज्यावर बसवून शत्रुघ्न येतो, त्याचा रामाबरोबर जाण्याचा निर्धार, बिभीषण, सुग्रीवादि वानरांचा रामाबरोबर जाण्याचा निश्चय, मारुती-जांबवंत-बिभीषण यांना शेवटच्या आज्ञा, राम अखेरच्या प्रवासाला निघतो, अयोध्येची सर्व प्रजा रामाबरोबर निघते, राम शरयूतीरावर येतो, आकाशात देव येतात, ब्रह्मदेवाची प्रार्थना, रामाचे ब्रह्मदेवाला सांगणे, रामाची अवतारसमाप्ती, रामभक्तांचा शरयूत देहत्याग, ग्रंथमाहात्म्य.
..........